गोवंशाच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य, मुक्ताईनगर “बंद” ला शंभर टक्के प्रतिसाद
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, अक्षय काठोके l मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गोवंशाच्या वासरावर १५ मार्च रोजी एका विशिष्ट धर्माच्या अल्पवयीन मुलाने अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकाराने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या. या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर सकल हिंदू समाज बांधवांकडून पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गोठ्यात बांधलेल्या गोवंशाच्या वासरावर १५ मार्च रोजी अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेने परिसरासह सर्वत्र मोठी खळबळ उडाली. या घटनेचा सर्व स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या संतापजनक व निंदनीय घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदुत्ववादी संघटनांनी १५ मार्च शनिवार रोजी मुक्ताईनगर तालुका बंद चे आवाहन केले होते. सदर आवाहनाला प्रतिसाद देत मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक व समस्त नागरिकांनी आज शांततेत शंभर टक्के बंद ठेवून प्रतिसाद दिला. आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.