महाराष्ट्र

राज्यात अवकाळी पाऊस : पुढचे ४८ तास महत्वाचे, मुसळधार पाऊस व गारपिटीच संकट

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि आसपासच्या परिसरात सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे वातावरणात हवापालट होत आहे. मराठवाड्याला या सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका अधिक आहे.

काही ठिकाणी ४० तर काही ठिकाणी ६० किमी ताशी वेगाने वारे वाहणार
राज्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी ४० तर काही ठिकाणी व ६० किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहेत.

मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे ४८ तास महत्त्वाचे
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवापालट पुढचे पाच दिवस पाहायला मिळणार आहे. तसेच काही भागात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे ४८ तास महत्त्वाचे आहेत. पुढच्या ४८ तासात मराठवाड्यात ३८ ते ४५ डिग्री तापमान राहील. विदर्भात मागच्या २४ तासात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये अवकाळीची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे.

नाशिक, जळगाव, नाशिक घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा, सांगली, इथे काही भागात ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, या जिल्ह्यात यलो अलर्ट, देण्यात आला आहे. अशी माहिती
हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिली आहे.

राज्यात आज आणि उद्या कमी अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अवकाळी पावसाचं संकट पुढचे ४८ तास महाराष्ट्रावर राहणार आहे. त्यानंतर पुढचे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात दाटून आलेल्या ढगांमुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे, त्याच धर्तीवर मंगळवारी नाशिकसह जळगावला ‘ऑरेंज’ आणि धुळ्यात पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमानवाढीचासुद्धा सामना करावा लागणार आहे. पावसाची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून यादरम्यान ताशी ३०  ते ४०  किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!