महाराष्ट्र

राज्यात अवकाळीचं संकट, “या” जिल्ह्यात पावसाचा इशारा, काय आहे हवामानाचा अंदाज?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या अनेक भागांमध्ये फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून गारठा देखील कमी जाणवत आहे. दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्रावर ही चक्रीवादळाचे परिणाम दिसत आहेत. महाराष्ट्रात आजपासून पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यासह काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हा इशारा देण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यासह काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. पश्चिम महाराष्ट्रात ५ डिसेंबर रोजी यलो अलर्ट दिला आहे. मध्य भारतापासून दक्षिणेत सर्वदूर डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

पुण्यात ४ आणि ५ डिसेंबर रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.

त्यासोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं सांगितली असून मराठवाड्यात डिसेंबर महिन्यामध्ये आता थंडीचा जोर अजून वाढणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. तसेच लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत पुढील ३ दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!