भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

दिवाळीला फटाके वाजणार : उत्तर महाराष्ट्रातील फटाकेविक्री बंदी मागे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक, प्रतिनिधी : ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. निर्बंध शिथील होत असल्याने दिवाळी उत्साहात साजरी करण्याकडे नागरिकांचा कल असताना नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या फटाकेबंदीच्या पत्रामुळे नवा धमाका झाला होता. मात्र आता उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देशही दिले होते. विशेष सभा घेऊन फटाके बंदीबाबत आपआपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशही गमे यांनी दिले होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 5 जिल्ह्यांना निर्देश दिले होते. मात्र,भुजबळ यांनी थेट प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या सोबत संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.

विभागीय पातळीवर पहिल्यांदाच फटाक्यांवर बंदी घालण्यात आल्याने स्थानिकांसह फटाके विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयावर हिंदुत्ववादी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करत हा तिढा सोडवला. भुजबळ यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी थेट संवाद साधून फटाके बंदीचा निर्णय मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

डॉ. गमे यांनी नाशिक विभागातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुबार जिल्ह्यासाठी फटाकेबंदीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी कराव्यात, असे पत्रात म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!