Video। भयंकर! अंत्य विधीसाठी सुद्धा पैशांची मागणी; व्हिडिओ व्हायरल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला असून दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे,मृतांचा आकडा ही वाढतच आहे शहरात तर स्मशानभूमीत अंत्यविधी साठी रांगा च्या रांगा लागत आहेत. एकीकडे कोरोना उपचारासाठी रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड शोधताहेत आणि यातच नाशिक शहरांमध्ये काही स्मशानभूमी मध्ये माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर येत आहे, मयतच्या नातेवाईकांकडून अंतिम विधी साठी पैशाची मागणी केली जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हयरल होत आहे.
नाशिक शहरातआजच्या घडीला संपूर्ण कोरोनाने हाहाकार घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रत्येक जण आपल्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी वणवण करून विनंती देखील करत आहे. नाशिक शहरामध्ये विदारक चित्र समोर येत आहे. अंतिम विधीसाठी सुद्धा नंबर लागत आहे. सर्व स्मशानभूमी रोज फुल होत आहेत. यातच आनंदवली मध्ये सुद्धा दहा ते पंधरा मयत अंतिम विधी करण्यासाठी येत असतात. परंतु तेथील कामगार प्रत्येक अंतिम विधीसाठी चार ते पाच हजार रुपयांची मागणी करत असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक संतोष गायकवाड यांना कळताच त्यांनी त्वरित या गोष्टीची शहानिशा करून संबंधित कामगाराला बोलावून त्याची कान उघाडणी करतांना दिसत आहे माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार तु याठिकाणी करू नको अन्यथा तुझ्यावरती कायदेशीर कारवाई करू असा सज्जड दम त्या कामगारास नगरसेवक गायकवाड यांनी दिला. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र विदारक दृश्य दिसत आहे.