भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

माणुसकीच काय ? बिलापोटी कोरोना मृत महिलेच्या बांगड्या घेतल्या काढून !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (निशांत साळवे): राज्यात कोरोनाचे थैमान घातले असतांना शहरात घडलेल्या या घटनेने जगात आता माणुसकीचा आहे का असा प्रश्न ? तुमच्या मनात निर्माण होईल… कोरोना रुग्णांची अनामत रक्कम घेतली जाऊ नये, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले असतानाही अनामत रक्कम व बिलापोटी नाशिक शहरातील काही रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची अडवणूक केली जात आहे. अशाच एका प्रकारात वेळेत अनामत न भरलेल्या मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या ठेवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

शहरातील देवळाली कॅम्प येथे एका रुग्णालय प्रशासनाने बिलापोटी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला, शकुंतला गोडसे (वय ६५, रा. लॅम रोड, देवळाली कॅम्प) या महिलेस १३ एप्रिलला कोरोना उपचारासाठी दाखल केले होते. तेव्हाच अनामत व मेडिकल बिलाचे मिळून सुमारे एक लाख रुपयांची मागणी रुग्णालय प्रशासनाने केली. मात्र, संबंधित कुटुंबीय ३५ हजारच जमा करू शकले. त्यामुळे पुढील दिवसभर व्यवस्थित उपचार न झाल्याने १४ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. दरम्यान, अंत्यसंस्कारानंतर शनिवारी (ता. १७) कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन बांगड्यांबाबत विचारणा केली. त्या वेळी सुरवातीला स्थानिक कर्मचाऱ्यांनी अशा बांगड्याच नसल्याचे सांगितले. मात्र, त्यातून रुग्णालयात गोंधळ होऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केल्यानंतर दुपारी साडेचारला नातेवाइकांना बोलावून घेत, रुग्णालयाने बांगड्या सुरक्षित असल्याचे सांगितले. त्याचवेळी रुग्णालयाचे बिल म्हणून आणखी काही रकमेची मागणी करीत, त्यानंतर बांगड्या दिल्या जातील, असे सांगितले यानंतर मृत महिलेचे नातेवाईक देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा तगादा लावल्याने पोलिसांनी तूर्तास केवळ तक्रार अर्ज घेतला असून, फिर्याद घेतली नसल्याचे मृतांच्या कुटुंबीयांनी सांगितले. मृत महिलेचा पुतण्या अनिल गोडसे यांनी रुग्णालय प्रशासनाच्या संवेदनाहिनते बाबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हा प्रकार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या लक्षात आणून दिला असता, त्यांनी पोलिस आयुक्त चौकशी करतील, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!