क्राईममहाराष्ट्र

तीन पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; कारवाईने खळबळ

मंडे टू मंडे वृत्तसंकलन-MTM Newsnetwork :

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनंतर पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तीन कर्मचारी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अपघाताच्या गुन्ह्यात अटक न करता कोर्टात हजर करण्यासाठी २५ हजारांची लाचेची मागणी करत तडजोडीअंती १३ हजाराची लाच स्वीकारताना सातपूर पोलिस ठाण्याचे हिरामण गणपत सोनवणे, राहुल पोपट गायकवाड आणि सारंग एकनाथ वाघ या तीन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. अशोकनगर परिसरातील बोलकर चौकीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली.

याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, सातपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल असून यातील संशयिताला अटक न करण्यासाठी २५ हजाराची मागणी केली. एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून तिघांना १३ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. यातील वाघला यापूर्वीही लाच घेताना अटक झालेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!