सोशल मिडियावर तरुणीशी हुज्जत घालून उत्तर प्रदेशातील तरुण थेट यावल तालुक्यात, ग्रामस्थांचा परप्रांतीय तरुणांना चोप
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील एका तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील तरुणा सोबत ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत या तरुणाने उत्तर प्रदेशातून थेट यावल तालुक्यातील तरुणीचे गाव गाठले. व तेथे तरूण व त्याच्यासोबत आलेल्या तरूणांनी तरूणीच्या कटुंबाशी वाद घातले. ही माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी चोप देत त्यांच्याविरूध्द यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील एका गावातील तरुणीची उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील सहागंज तालुक्यातील जरनापुर टपरी येथील राहणाऱ्या शिवम रवींद्रकुमार आस्थाना. वय २६ वर्ष. या तरूणाशी ओळख झाली. ओळखीनंतर ते सोशल नेटवर्कवर एकमेकांशी बोलू लागले.यातून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून शिवम आस्थाना हा त्याचे तीन मित्रांना घेऊन शनिवारी थेट त्या तरूणीच्या गावात आला. त्यानंतर ते तरुणीच्या घरीच पोहोचले.
तर सोशल नेटवर्कवरून ओळख झालेल्या त्या तरुणाला पाहून तरुणी आवाकच झाली. या चौघांनी त्या तरुणीसह तिच्या आईशी वाद घालायला सुरुवात केली. हे अनोळखी मुले काय वाद घालत आहेत, हे पाहून गावातील ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. जमलेल्या ग्रामस्थांनी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर या चौघांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. या नंतर त्या चौघांना यावल पोलीस स्टेशनला आणले. यावल पोलिस स्टेशनला तरुणीच्या आईने उत्तर प्रदेशातील चौघा तरुणां विरुद्ध तक्रार दिली आहे.