भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

पीपीई कीट घालून वॉर्ड बॉयने केली रेमेडिसीवरची चोरी !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (निशाद साळवे)। नाशिकमध्ये पीपीई किट घालून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रेमेडिसीवर इंजेक्शनच चोरी केल्याची घटना समोर आली आहे, श्री गुरुजी रुगणालयातून OT मदतनीस आणि वॉर्ड बॉय यांनीच रेमेडिसीवर इंजेक्शन चोरल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे…

याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की (दि.17) रात्री 9.42 वाजेच्या सुमारास गंगापूररोड वरील श्रीगुरुजी रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावर एक कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत होता. त्याला देण्याकरिता रुग्णालयांकडून 2 रेमडीसिव्हर इंजेक्शन रुग्णालयातील नर्सिंग काउंटरवर ठेवण्यात आले होते. यावेळी लिफ्ट मधून पीपीई घातलेले 2 इसम तिसऱ्या मजल्यावर आले. त्यापैकी एकाने कोविड वॉर्डात प्रवेश करून नर्सिंग काउंटर वरून औषधांच्या बॉक्स मधून 2 रेमेडिसिव्हर इंजेक्शन घेतले.

श्रीगुरुजी रुग्णालयातील प्रशासन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. संशयित व्यक्तीचा शोध घेतला असतांना यातील मुख्य आरोपी वॉर्डबॉय विकी वरखेडे असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास करत असताना वॉर्डबॉय गणेश गंगाधर बत्तीसे आणि ओ.टी मदतनीस सागर सुनिल मुटेकर यांचे वागणे पोलिसांना संशयास्पद वाटत होते. पोलिसांनी cctv फुटेज च्या आधारे प्रकरणाचा शोध घेत प्रकरणाचा छडा लावत रुग्णालयातीलच OT मदतनीस सागर सुनील मुटेकर आणि वॉर्ड बॉय गणेश गंगाधर बत्तीसे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 10, 800 रुपयांचे चोरी केलेले रेमेडिसीवर जप्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!