क्राईमभुसावळ

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : दोघ भावांचा मृत्यू !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

वरणगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा| भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने राष्ट्रीय महामार्गावरील जाडगाव फाट्यानजीक पिंपळगाव बुद्रुक येथील दोघे तरुण चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपनगर येथून रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दुचाकीने घरी परत येत असतांना सोपान रमेश मावळे (वय-१९), सचिन सुभाष मावळे (वय-१८) यांना जाडगाव फाट्यानजीक समोरून येणारा ट्रक (एम.एच.१५ एफ.व्ही.१४१३) ने जोरदार धडक दिल्याने सचिन यांचा जागीच मृत्यु झाला तर सोपान यास गंभीर अवस्थेत वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवत असताना त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातस्थळावरून ट्रक चालक पसार झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!