भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळराजकीय

प्रभागनिहाय शाखा, घर तिथे शिवसैनिक- वरणगाव शहरप्रमुख रवींद्र सुतार

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मंडे टू मंडे, वृत्तसेवा : शिवसेना वरणगाव शहर व अंगीकृत संघटनांची ची महत्त्वपूर्ण बैठक मोठे श्री.विठ्ठल मंदिर,जुनी भाजी साथ,वरणगाव येथे संपन्न झाली. बैठकीस सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, मॉसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून तसेच वरणगाव व परिसरातील शिवसेनेचे संस्थापक पदाधिकारी असलेले दिवंगत तालुकाप्रमुख स्व. संजीवदादा कोलते यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून बैठकीची सुरवात करण्यात आली.

बैठकीस अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ शिवसैनिक, माजी शहरप्रमुख श्री.गोविंद मांडवगणे, शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्याध्यक्ष श्री.अतुल शेटे,माजी तालुकाप्रमुख महेंद्र शर्मा,शहरप्रमुख रवींद्र सुतार इ.नी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात श्री.मांडवगणे यांनी संघटनात्मक बांधणीबाबत मौलिक मार्गदर्शन करत दिवंगत स्व.संजीवदादा कोलते यांच्या आठवणींना उजाळा देत “शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपल्याचे” विधान केले. सदर बैठकीत नियमित पक्षादेशा नुसार “शिवसंपर्क अभियानप्रमुख,वरणगाव.” म्हणून माजी शहरप्रमुख गुणवंत भोई यांची निवड करण्यात आली.

भुसावळ तालुक्यात व वरणगाव येथे प्रतिनिधी नेमणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा…

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेचे “शिवसंपर्क अभियान” सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून विविध कार्य नियोजनार्थ सदर बैठकीत प्रभागनिहाय बैठका घेऊन शिवसैनिकांना अभियानाची माहिती देणे,शिवसैनिक नोंदणी करणे,नवीन शाखांची निर्मिती व जुन्या शाखांची पुनर्स्थापना करणे, प्रत्येक प्रभागात शिवसेना,युवासेना आणि महिला आघाडीची शाखा स्थापन करणे, गृहसंपर्क करून शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कामे जनतेपर्यंत पोचवणेसाठी बूथ पातळीवर यंत्रणा तयार करणे,सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांपर्यंत पोचून त्यांना सक्रिय करणे तसेच दि.२७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प करण्यात आला.बैठकीचे आयोजन व सूत्रसंचालन उपशहरप्रमुख सुनील भोई यांनी केले.

बैठकीस जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा,माजी शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर,उपशहरप्रमुख सुकदेव धनगर,तुषार चौधरी,बाळूभाऊ माळी,यशवंत बढे,उमाकांत झांबरे,अशोक शर्मा,दिगंबर चौधरी,संजय कोळी,राजाभाऊ भोई,मनोज बोदडे,राजू धनगर,गणेश माळी,युवासेनेचे हर्षल वंजारी,राहुल भोई,निलेश देवघाटोळे,योगेश भोई,जयेश हजबन,भूषण शर्मा व शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!