भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

महाराष्ट्र बंदला वरणगाव मध्ये गालबोट : महाविकास आघाडी व भाजप कार्यकर्त्यात राडा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मंडे टू मंडे वृत्तसेवा : महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये वरणगाव येथे महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारामारीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

वरणगाव येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करत होते. भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते. दोन्हीकडून शहरभरामध्ये वेगवेगळा प्रचार केला जात असतानाच दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मारामारी झाली. दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले जात आहे. आम्ही शांततेमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदला समर्थन द्या असं सांगत असताना भाजपाचे लोक तिथे आला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने वाद झाल्याचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. भाजपाचे शहराध्यक्ष सुनील महाडीक यांनी आम्ही व्यापाऱ्यांना दुकान बंद करु नका असं सांगत शहरामध्ये फिरत असताना अचानक जमावाने आमच्यावर हल्ला केल्याचा दावा केलाय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!