भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

माहेरहून नवीन दवाखाना सुरु करण्यासाठी १५ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

वरणगाव,ता. भुसावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। माहेरवरुन नवीन दवाखाना सुरु करण्यासाठी १५ लाख रुपये आण नाहीतर तुला सोडून देऊ अशी धमकी देत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला.

यासंदर्भात अधिक असे की, बुशरा खानम हुजैफा शेख या २० वर्षीय विवाहितेचा हुजैफा शेख (पती), रईस शेख न्याज मोहम्मद (सासरे), तला शेख रईस (दिर), आवेश शेख रईस (दिर), सना अजहर शेख (नणंद), अजहर शेख रउफ (नंदोई) यांनी नवीन दावखाना सुरु करण्यासाठी तुझा माहेरवरुन १५ लाख रुपये घेवुन ये नाहीतर मी तुला सोडुन देईल अशी धमकी दिली. विवाहितेचा वेळोवेळी शारिरिक व मानसिक छळ करुन हुजैफा शेख (पती) यांने दि.०३ मे २०२२ रोजी नविन दवाखाना सुरु करण्यासाठी १५ लाख रुपये दिले नाहीत म्हणुन विवाहितेच्या माहेरी वरणगाव येथे येत विवाहितेच्या माहेरच्या लोकांसमोर बुशरा मै तुम्हे तलाक देता हु, असे तीन वेळेस बोलून बेकायदेशीर तलाक दिला. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात विवाहात बुशरा खानम हुजैफा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुजैफा शेख (पती), रईस शेख न्याज मोहम्मद (सासरे), तला शेख रईस (दिर), आवेश शेख रईस (दिर), सना अजहर शेख (नणंद), अजहर शेख रउफ (नंदोई) या सासरच्यां लोकांविरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!