वरणगावात तरुणांचा धारदार शस्त्राने खून : चार संशयित ताब्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
वरणगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील आंबेडकर नगरात जुन्या वादातून एका तरूणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असून याप्रकरणी पोलीसांनी चार संशयितांना अटक केली आहे. खुनाच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शहरातील सचिन युवराज मगरे (वय-२९) राहणार आंबेडकर नगर या तरुणांचा सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शहरातील डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळ्या जवळील महालक्ष्मी सॉमीलच्या समोर चार जणांनी धारदार शस्त्राने वार करून खुन केल्याची घटना घडली असून याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खून करण्यात आलेल्या तरुण व आरोपींमध्ये मागे वाद झाला होता सदरील वाद मिटवण्यात आला होता मात्र काल रात्री यातूनच सचिन मगरे याची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.