सहा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
वरणगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वरणगाव येथील फैजल अश्फाक शेख याने आपल्याच शेजारी राहणाऱ्या ६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली .
या बाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव येथील फैजल अश्फाक शेख, वय २१, वरणगाव,ता. भुसावळ . याने ३ एप्रिल २०२२ रोजी दुपारी शेजारीच राहणाऱ्या ६ वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलाला तुला नवीन बॉल घेण्यासाठी २० रुपये देतो, असे आमिष दाखवत आपल्या घराच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. त्यानंतर पिडीत मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या बाबत पिडीत मुलाच्या आईने वरणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने ५६/२०२२ भादवी कलम ३७७ पोक्सो कायदा कलम ४,८ प्रमाणे फैजल अश्फाक शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.