वरणगाव मध्ये गावठी कट्टयाचा धाक दाखवून दहशत, तरूणास अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
वरणगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। गावठी कट्टयाचा धाक दाखवून दहशत माजविणार्या तरूणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या सादरची घटना भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील असून यश उर्फ सोनू युवराज तायडे, वय १९ या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव येथील प्रतिभा नगरात यश उर्फ सोनू युवराज तायडे हा तरूण गावठी कट्टयाचा धाक दाखवून लोकांना घाबरवत असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्या नुसार त्यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन वरणगाव येथील प्रतिभा नगरात कारवाई केली.यात यश उर्फ सोनू युवराज तायडे या तरूणाची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे २० हजार रूपये मूल्याचा गावठी कट्टा आढळून आला. यामुळे कट्टा जप्त करून यश तायडे याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व एलसीबीचे वरिष्ठ निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ दिपक पाटील, हे.कॉ लक्षमण पाटील, पो.ना किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील आणि राजेंद्र पवार यांनी केली.