शिवजयंती निमित्त माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे येथे विविध कार्यक्रम
गोलवाडे, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला यामध्ये श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंग, पोवाडे, गीते, विविध नाटिका सादर करण्यात आल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुरी गोलवाडे येथील लोक नियुक्त सरपंच श्री स्वप्नील तायडे तसेच प्रमुख पाहुणे बलवाडी येथील लोकनियुक्त सरपंच वैशाली महाजन, पुरी गोलवाडे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच, तसेच पुरी गोलवाडे भामलवाडी शिंगाडी येथील विविध ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवक युवा तरुण यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमासाठी मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील सर यांनी तर सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले, कार्यक्रम यशस्वी ते साठी सचिन पाटील, विजय पाटील, अंबादास पाटील, सचिन कचरे, पंकज पाटील, अमोल पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक श्री स्वामी समर्थ ग्रुप चे अध्यक्ष मनोज पाटील सर यांनी केले