भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेरसामाजिक

जागतिक डेंग्यू दिवस निमित्त निंभोरा बु ता. रावेर. येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | दरवर्षी १६ मे रोजी सर्वत्र साजरा केला जातो यामध्ये डेंगू आजाराबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यापासून बचावासाठी विविध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने प्रा. आ.केंद्र- निंभोरा बु. तालुका रावेर येथे व कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे डेंगू दिवस साजरा करण्यात आला.

निंभोरा गावात व कार्यक्षेत्रातील सहा उपकेंद्रांची गावे निंभोरा बालवाडी दसनूर वाघोदा बुद्रुक शिर्डी बुद्रुक येथे मुख्य चौकांमध्ये व ग्रामपंचायतीच्या आवारात जनतेला आठवड्यातून एक दिवस वर्धा दिवस पाडणे व संडासच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवणे गटारी वाहत्या करणे जुन्या टायर्स जुने मार्ट फुटकी भांडी ज्यात पावसाचे पाणी साचते अशी निरुपयोगी भांडी नष्ट करणे जेणेकरून डेंगूचे डास निर्माण होणार नाही व डेंगू आजाराची लागण होणार नाही,याबद्दल आरोग्य शिक्षण जनतेला अवगत व्हावे म्हणून म्हणून गावागावात गटसभा आयोजित केल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  डॉ. प्रमोद सोनवणे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे. वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय रिंढे. डॉ.निरज पाटील.  विजय नेमाडे तालुका पर्यवेक्षक रावेर व  आर. के. पाटील. (एल एस ओ ) आर. आर. महाजन.(पी. ओ.)आरोग्य सहाय्यक  व्ही.एस. जबडे व बी. व्ही. इंगळे. श्रीमती भारती रामावत. सिस्टर. (एल एच. व्ही ) आरोग्य सेवक विशाल भोई अजय सोळुंके. अजित राणे. मनीषा तायडे.( ए. एन. एम.)मोहित पाटील.आदी उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!