महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे यांचे वाढदिवसा निमित्त सावदा येथे विविध कार्यक्रम संपन्न
सावदा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे यांचे वाढदिवसा निमित्त सावदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात निवासी मतिमंद विद्यालय येथे तसेच मुलींची शाळा येथे विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाल येथील ग्रा. प. सदस्य प्रदीप जाधव हे होते ते प्रमुख पाहुणे म्हणून निवासी मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पाटील, आ. अमोल जावळे यांचे तर्फे त्यांचे प्रतिनिधी भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे सदस्य विजय पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले, तालुकाध्यक्ष रवींद्र महाजन आदी होते.
यावेळी दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते खाऊ, लाडू, व साहित्य वाटप करण्यात आले सूत्र संचालन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा कार्यध्यक्ष दिपक श्रावगे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा कार्यध्यक्ष योगेश सैतवाल, सुरेश पवार, कैलास लवंगडे, प्रदीप कुलकर्णी, संतोष परदेशी, राजेश चौधरी, विजय अवसरमल, मगन पवार, देवेंद्र चौधरी, महेंद्र पाटील, अझहर खान, प्रदीप जाधव तसेच निवासी मतिमंद शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते