भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

वरणगाव येथे बायो डिझलेचा साठा जप्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

वरणगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। एलसीबी पथकाने वरणगाव येथील निर्मल ढाब्याजवळ सापळा रचुन चौकशी केली असता राज्यात बंदी असलेल्या बायो डिझलेची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेख निसार,वय १९, रा. वरणगाव. हितेश वासुदेव शर्मा , वय २४, रा. वरणगाव ,सिकंदर खान इस्माईल खान , वय ५०, रा. मिल्लतनगर, भुसावळ असे संशयिताचे नाव असून, पोलिसांनी बायो डिझेलसह ७ लाख ३७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सविस्तर असे की, राज्यात बंदी असलेल्या बायो डिझलेची विक्री होत असल्याचा प्रकार रविवारी पुन्हा समोर आला. एलसीबीने रविवारी पहाटे वरणगावजवळ पुन्हा एकदा बायो डिझेलचा साठा पकडला आहे. यात बायो डिझेलसह साहित्य असा ७ लाख ३७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, अशोक जाधव, ममराज राठोड, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, विठ्ठल फुसे, प्रमे सपकाळे, संजीव मेंढे यांच्या पथकाने रविवारी पहाटे वरणगाव येथील निर्मल ढाब्याजवळ सापळा रचला. तेथे काही तरुण कॅनमध्ये बायो डिझेल घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आत जाऊन चौकशी केली असता तेथे शेख निसार ,वय १९, रा. वरणगाव, हितेश वासुदेव शर्मा वय २४, रा. वरणगाव, सिकंदर खान इस्माईल खान,वय ५०, रा. मिल्लतनगर, भुसावल या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणावरुन पोलिसांनी २ लाख ३५ हजार २०० रुपयांचे बायो डिझेलसह एकूण ७ लाख ३७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयिताविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!