भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

वेध विधानसभेचे ! महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले पोस्टर्स

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातीलच नव्हे तर देशातील निकाल धक्कादायक ठरले. अनेक लढतील शेवटपर्यंत उत्सुकता ताणली गेली होती. लोकसभेचे सर्व निकाल आले आहेत. केंद्रात एनडीएचे बहुमत म्हणजेच २९२ जागा मिळाल्याने भाजपाचे सरकार होण्याची चिन्हं आहेत. नव्हे भाजपचे सरकार बसेल यात शंका नाही. दुसरीकडे इंडिया आघाडीला देखील २३० जागा मिळाल्याने राहुल गांधी यांचा देखील नेतृत्व म्हणून राजकीय क्षेत्रावर उदय होत आहे.


त्यातच महाविकास आघाडीला महाराष्ट्रात २९ जागा मिळाल्याने माहाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातल्यात्यात कॉंग्रसेला सर्वाधिक १३ खासदार महाराष्ट्रात मिळाल्याने कॉंग्रेसला नव संजिवनी मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाला ८ तर शरद पवार गटाला ८ अशा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा उत्साह वाढला असून मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य पसरले आहे. महाराष्ट्रात दिवाळी आधीच विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्याआधीच पोस्टरबाजीतून प्रोजेक्शन सुरु आहे. तर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पोस्टर्स महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून लावायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील निकाल धक्कादायक लागले असून आता महाराष्ट्रात लागलीच विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणूका दिवाळीच्या आधीच उरकण्याची तयारी आहे. लोकसभेतील विजयामुळे प्रत्येक पक्षाने एका लोकसभेतील सहा विधानसभा क्षेत्राप्रमाणे आपल्याला विधान सभेत किती आमदार मिळतील याचे गणित करायला सुरुवात केली आहे.या गणीतांवर आपलंच  सरकार बसेल या भावनेत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पोस्टर्स महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून लावायला सुरुवात केली आहे. या लोकसभा निवडणूकीतील यशाच्यामुळे आता सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेसला सर्वाधिक खासदार मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नागपूरात पोस्टर्स कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेसला १३ खासदार मिळाल्याने उत्सहाच्याभरात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पोस्टर्स महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी नागपूरात जागोजागी नाना पटोले यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावली आहेत. गेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली होती. आता २०२४ च्या लोकसभा निवडणूकात महाराष्ट्रात सर्वाधिक १३ जागी खासदार निवडून आल्याने कॉंग्रेस महाविकास आघाडीतीस सर्वात मोठा पक्ष ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!