Video;कोरोना संसर्गामुळे मोठ्या उत्साहात होणारा मुक्ताई यात्रोत्सव रद्द; मंदिर परिसरात शुकशुकाट
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा महाशिवरात्रिचा मुक्ताई यात्रोत्सव यंदा कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आलेला असून परंपरेप्रमाणे आज एकादशी निमित्त मुक्ताई संस्थान महापूजा संपन्न करण्यात आली याप्रसंगी अध्यक्ष अँड. रवींद्रभैय्या पाटील व ह भ प रविंद्र महाराज हरणे, उद्धव महाराज जुनारे यांनी भाविकांनी दर्शनाला येऊ नये असे आवाहन मंडे टू मंडे शी बोलतांना केले आहे. पहा याबाबतचा हा विशेष वृतांत…
दरवर्षी माघ महिन्यातील विजया एकादशी पासून महाशिवरात्रि पर्यंत मुक्ताईनगर व चांगदेव येथे यात्रोत्सव भरत असतो परंतु यंदा कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आलेला आहे कुठल्याही प्रकारची दुकाने परिसरात लागलेली नाहीत तरी परंपरेप्रमाणे आज एकादशी निमित्त मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्यासाहेब पाटील पंजाबराव पाटील व संदीप पाटील यांच्या हस्ते महापूजा संपन्न करण्यात आली तसेच जुने मुक्ताबाई संस्थान कोथळी येथे सुद्धा महापूजा संपन्न करण्यात आले याप्रसंगी ह भ प रविंद्र महाराज हरणे उद्धव महाराज जुनारे विनायक महाराज हरणे ज्ञानेश्वर हरणे उपस्थित होते