Video। मुक्ताईनगर तालुका कोरोना हॉटस्पॉटच्या मार्गावर: प्रशासनाकडुन वेळीच उपाययोजना आवश्यक!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर/अक्षय काठोके: तालुक्यात सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे गेल्या दोन दिवसात तब्बल 332 रूग्ण आढळले असले तरी सकाळी अत्यावश्यक वस्तू खरेदी नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून त्यामुळे कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे तसेच खेडोपाडी नागरिक मास तसेच सोशल डिस्टंसिंग पाडताना दिसत नाही त्यावर प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
चौफुलीवर खरेदीसाठी दररोज सकाळी हजारो लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते यावर प्रशासनाचे कुठले अंकुश दिसून येत नाही अशीच परिस्थिती राहिली तर तालुक्याची स्थिती हाताबाहेर जाऊन आरोग्य यंत्रणा कोलमडू शकते यावर प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत