मुक्ताईनगरव्हिडिओ

Video। मुक्ताईनगर प्रभाग 13 चे नागरिक नरक यातनेत; किडे व शेवाळे युक्त गटारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचे दुर्लक्ष !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। मुक्ताईनगर मधील प्रभाग क्रमांक 13 विश्वकर्मा मंदिर येथील रहिवासी यांच्या घरासमोर अक्षरशा गटारीचे पाणी रस्त्यावर आले आहे व त्या पाण्यामध्ये शेवाळ व किडे पडले आहेत, याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी नगरपंचायत येथे पत्रव्यवहार केला तसेच स्थानिक नगरसेवकांना सुद्धा संपर्क केला असता ते फोन उचलायला तयार नाहीत, असा स्थानिकांनी नागरिकांचे म्हणणे आहे.

सध्या कोरोना ने राज्यात धुमाकूळ घातला आहे अशा दूषित पाण्यामुळे घरातील नागरिकांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे असा आरोप येथील नागरिकांचा आहे तरी स्थानिक नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी याबाबत लक्ष घालून येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!