Video। संकट मोचक हनुमानाचे जन्मोत्सवादिनीही बाहेरून दर्शन: शिरसाळा मंदिर बंद!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन:
मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। सध्या राज्यात कोरोना विषाणु ने थैमान घातले असल्याने खबरदारी म्हणून शासनाने लॉक डाऊन जाहीर केलेला आहे व त्यामुळे धार्मिक स्थळे सुद्धा बंद आहे याच कारणामुळे बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील प्रसिद्ध असे जागृत हनुमान मंदिर देखील बंद आहे… परंतु भाविक मारोती रायाचे दर्शना साठी सकाळ पासूनच पायी चालत येतांना दिसले.पंचक्रोशीतील सर्व भाविक ह्या ठिकाणी आपली आस्था घेऊन येतात.आणि त्यांची मनोकामना देखील मारोती राया पूर्ण करतात असे भाविक बोलतात.मारोती राया ह्या संपूर्ण संकटातून नक्कीच बाहेर काढेल असे देखील भाविकांनी सांगितले.
सर्व भाविकांना गेटच्या बाहेरुनच दर्शन घेण्यासाठी आवाहन करण्यात आले.मंदिराचे अध्यक्ष तसेच पुजारी यांच्याकडून भाविकांना आवाहन करण्यात आले,सध्या लॉक डाऊन असल्यामुळे मंदिर बंद आहे त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये व मंदिर प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन अध्यक्ष. विश्वनाथ पाटील यांनी केले असून या वेळी मेघराज बाफना नाशिक,हरिभाऊ बोरसे, भागवत पाटील, रामदास दांडगे, बाबुराव कचरे,पुजारी. प्रल्हाद धनगर आदी उपस्थित होते.