Video| आ.चंद्रकांत पाटलांचे स्टिंग ऑपरेशन : विम्यासाठी लाच मागणाऱ्या विमा प्रतिनिधींस घेतले फाईलावर
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुक्ताईनगर, अक्षय काठोके : चक्रीवादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून बजाज अलियन्स विमा कंपनी कडून नुकसान भरपाई तात्काळ मिळणेसाठी शेतकर्यांकडून लाच स्वीकारतांना विमा कंपनीच्या प्रतिनिधींना आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनासोबत स्टींग ऑपरेशन करून त्यांना रंगेहात पकडून दिल्याने खळबळ उडाली असून आपल्या आक्रमक शैलीत फाईलावर घेतांना दिसत आहे…पहा हे Exlcusive व्हिडिओ वृतांत…
याबाबत सविस्तर असे, नुकतेच चक्रीवादळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून बजाज अलियन्स विमा कंपनी कडून नुकसान भरपाई तात्काळ मिळणेकामी लाचेची मागणी विमा कंपनीचे प्रतिनिधी करीत असल्याची तक्रार कर्की ता.मुक्ताईनगर येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान आज दि.१४ जून रोजी सदरील परिसरातील शेतकऱ्यांची बैठक बोलावून विमा कंपनीचे प्रतिनिधी पैसे ठरवीत होते.अशी माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसिलदार श्वेता संचेती , तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी व कर्मचारी तसेच बजाज अलियन्स विमा कंपनीचे जळगांव चे अधिकारी असे पथक वेष बदलवून सदरील बैठकीत प्रवेश केला आणि ठरल्याप्रमाणे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी लाच स्वीकारताच दोघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बजाज अलियन्स कंपनीचे जळगांव चे अधिकारी पंचानामा करीत असून यानंतर तालुका कृषी विभागातर्फे गुन्हा दाखल करणेकामी पुढी कार्यवाही करण्यात येत आहे.
प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, तहसिलदार श्वेता संचेती , तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी , तालुका कृषी विभागातील इतर कर्मचारी तसेच दिलीप चोपडे , प्रवीण महाजन व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.