भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलव्हिडिओ

(Video)अंबिका वाइन सेंटर भागात देशीची मोठ्या प्रमाणात विक्री, ५२ रुपयाची क्वॉरटर ब्लॅकने ७० रुपयात, दारू उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष !

यावल (सुरेश पाटील)। यावल येथे सातोद रोडवर असलेल्या अंबिका वाइन सेंटर परिसरात आणि संपूर्ण यावल शहरात ठिकाणी तसेच ग्रामीण भागात देशी दारूची 52 रुपयाची क्वॉरटर काही अवैध देशी दारू विक्रेते अंबिका वाईन सेंटरमधून ग्राहक म्हणून अधिकृतरित्या मोठ्या संख्येने घेऊन बाजारात 60 ते 70 रुपयात अवैधपणे खुलेआम विक्री करीत असल्याचे एका व्हिडीओ क्लिप मधून प्रत्यक्ष दिसून येत आहे.

सातोद रोडवरील अंबिका वाइन सेंटर हे यावल परिसरातील एकमेव अधिकृत वाईन सेंटर आहे. देशी दारू पिणाऱ्या ग्राहकाला आपल्या लायसन्स वरती एका वेळेला किती क्वॉरटर घेता येतात. आणि पुन्हा किती दिवसानंतर एकाच दुकानातून पुन्हा किती क्वॉरटर विकत घेता येतात. या सर्व बाबी वाइन सेंटर मालकाच्या रजिस्टरला आणि दारू उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणीच्या वेळेस दिसून येत असतील ही वस्तुस्थिती असली तरी देशी दारु पिणारे काही ग्राहक आपल्या लायसन्सचा गैरवापर करून वाईन सेंटर मधून अधिकृत रित्या 52 रूपयात क्वॉरटर खरेदी करून बाजारच तीच बाटली 60 ते 70 रुपयात विक्री करीत असल्याचे बोलले जात असले तरी बाजारात चढ्या भावाने देशी दारू विक्री करणाऱ्यांची आणि संबंधितांशी हातमिळवणी आहे का ? काही ठराविक ग्राहकांना वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात देशी दारू कुठून आणि कशी मिळते याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत देशी दारूचे लायसन्स ज्यांच्याजवळ आहे त्यांच्या नावाने त्यांच्या लायसन्स वरती किती माल विक्री झाला याची तपासणी दारू उत्पादन शुल्क विभागाने केल्यास वस्तुस्थिती संपूर्ण जनतेसमोर येईल असे यावल परिसरात बोलले जात आहे.

आज दिनांक 16 ऑगस्ट 2020 रविवार रोजी दुपारी एका व्यक्तीने अंबिका वाइन सेंटर प्रवेश द्वाराजवळ आणि आत देशी दारू एका पिशवीत घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या पिशवीची प्रत्यक्ष पाहणी करून विचारणा केली असता त्या देशी दारूच्या बाटल्या असलेली पिशवी काउंटर कडे एक जण पुन्हा घेऊन जात असल्याचे प्रत्यक्ष दिसून येत असल्याने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ? त्या देशी दारूची पिशवी गेट पासून काउंटर कडे पुन्हा परत का नेली ? ग्राहकाने त्या देशी दारूचे पैसे दिले नव्हते का ? किंवा च्या पिशवीतील देशी दारू बाहेरील बनावट देशी दारू होती का ? किंवा ती पिशवी ज्या ग्राहकाची होती त्याच्याजवळ देशी दारूचे लायसन्स नव्हते का ? यावल शहरात व परिसरात ठिक–ठिकाणी देशी दारूच्या बाटल्या जास्त भावाने विक्री करण्यात येतात त्यांचे बॅच नंबर भुसावळ येथील दारू उत्पादन शुल्क विभागाने कधी तपासणी केली आहे का ? इत्यादी अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असून यावल शहरात अंबिका वाइन सेंटर मधून देशी दारू विकत घेणाऱ्या ग्राहकांचे लायसनची यादी आणि लायसन्स धारकाने आतापर्यंत किती माल उचलल केला आहे याची तपासणी करून कडक कार्यवाही करावी असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!