Video। विकेंड लॉकडाऊन च्या नावाखाली सुरु केलेले पूर्ण लॉकडाऊन तत्काळ उठवावा; मुक्ताईनगर व्यापाऱ्यांचे निवेदन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। ब्रेक द चेन या ब्रीद वाक्याने महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन सुरु करण्याची घोषणा झाली होती परंतु दुसऱ्याच दिवशी संपूर्ण लॉकडाऊन राबविण्याबाबत प्रशासनाणे उचललेली पावले अत्यंत निषेधार्थ आहे अशाप्रकारचे लॉकडाऊन आम्हा सर्व व्यापारी आणि व्यावसायिक बांधवापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे त्यामुळे आम्ही याचा तीव्र निषेध करतो अशा प्रकारचे निवेदन आज मुक्ताईनगर व्यापारी मंचाचे अध्यक्ष नितीन (बंटी) जैन यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे दोन व्यापाऱ्यांचा उपस्थितीत नियमाचे पालन करून देण्यात आले निवेदनावर १००-१५० व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत