भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

चीनमध्ये पहिल्यांदाच आढळला माणसामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग !

बीजिंग, वृत्तसंस्था : जगात प्रथमच मानवामध्ये (H3N8) म्हणजे बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. चीनच्या हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, मंगळवारी ही माहिती समोर आली आहे. त्याच वेळी, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) जारी केलेल्या निवेदनात ही बाब घोषित करण्यात आली आहे.

H3N8 बद्दल अधिक माहिती देताना चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने सांगितले की, एका चार वर्षांच्या मुलाला याचा त्रास झाला होता. NHC नुसार, तापासह अनेक लक्षणे विकसित झाल्यानंतर मुलाला H3N8 विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. पण त्याचवेळी लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही. 

त्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती या विषाणूच्या विळख्यात आली नाही, ही दिलासादायक बाब आहे. NHC नुसार, मुलगा त्याच्या घरात पाळलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये तापासह अनेक लक्षणे दिसली आणि तपासणीत त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले.

आरोग्य आयोगाने सांगितले की H3N8 प्रकार घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये जगात प्रथम आढळला आहे. तथापि, H3N8 चे कोणतेही मानवी प्रकरण नोंदवले गेले नाही. म्हणजेच ही जगातील पहिली मानवी केस आहे. या प्रकारात अद्याप मानवांना प्रभावीपणे संक्रमित करण्याची क्षमता नव्हती. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार होण्याचा धोका कमी आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!