Vidoe : NASA ने केले १० वर्ष सूर्याचे निरिक्षण; बघा ‘कसा’ बदलला सूर्य!
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेने (एसडीओ) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याने सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सूर्यामध्ये नेमके काय बदल होत आहेत, यावर नासाच्या शास्त्रज्ञांचा अभ्यास सुरू आहे. नासाच्या सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरीने सूर्याचे चित्रीकरण करण्यात आले. या ऑब्जर्वेटरीने काही महत्त्वाची निरीक्षण नोंदवली आहेत. या ऑब्जर्वेटरीने चित्रित केलेला व्हिडिओ नासाने टाइम लॅप्स ट्विट केला आहे.
10 years.
20 million gigabytes of data.
425 million hi-res images of the Sun.A new time-lapse video marks a decade of operations for our @NASASun Solar Dynamics Observatory. Watch: https://t.co/jRRWuBfcLb pic.twitter.com/SPBDWfJwzP
— NASA (@NASA) June 24, 2020
नासाने याचा टाइम लॅप्स व्हिडिओ प्रसिद्ध केला असून सूर्याची ४५ कोटी हाय-रिझोल्यूशन छायाचित्रे घेतली. तर, तब्बल दोन कोटी गीगाबाईट डेटा जमा केला. नासाने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरीद्वारे तब्बल १० वर्ष निरीक्षण करून अभ्यास केला आहे. या दरम्यान गेल्या ११ वर्षापासून सौर चक्राच्या गतीमधील बदल या व्हिडिओमध्ये टिपण्यात आले असल्याचे नासाने म्हटले आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून सूर्याच्या गतीमध्ये होत असलेल्या बदलाचा आणि सौरमंडळावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करता येणार आहे, तसेच यामध्ये नासाच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत.
नासाने युट्यूबवर शेअर केलेल्या ६० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एका सेंकदाला एक दिवस दाखवण्यात आला असून या तासाभराच्या व्हिडिओत सूर्याचा ११ वर्षातील बदलाचे निरीक्षण केल्याचे दाखवण्यात आले आहे. सूर्याच्या गतीमध्ये होत असलेल्या बदलाचा आणि सौरमंडळावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करता येणार आहे. दर ११ वर्षांनी सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात बदल होतो. हाच बदल याद्वारे टिपण्यात आला आहे.