भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ग्राम विकास अधिकारी २५ हजारांची लाच घेताना जळगाव एसीबी च्या जाळ्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गटारी व गावहाळ बांधण्याचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या नितीन भीमराव ब्राम्हणे वय ३७ वर्ष, या ग्रामविकास अधिकाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पडले आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील आरोपी  ब्राम्हणे यास आज रोजी मा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड दिली आहे.

तक्रारदार यांनी दिनांक २२ मार्च २०२५ रोजी तक्रार दिली की, तक्रारदार यांनी त्यांचे गावात गटारीचे २ लाखाचे व गावहाळ बांधण्याचे ७०,००० रुपयाचे अशी २,७०,००० रुपयाचे काम केले होते. ग्रामसेवक नितीन भीमराव ब्राम्हणे यांनी तक्रारदार यांचे तर्फे वर प्रमाणे करण्यात आलेल्या दोन्ही कामाचे बिल काढुन देऊन, सदर कामाचे १,९५,००० व ६९,००० असे २ स्वतंत्र चेक दिले होते व सदर बिलाची एकूण रक्कम २,६४,००० रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती. तक्रारदार यांचे कामाची बिले व सदर बिलांचे २ चेक काढून दिले. या कामाचा मोबदला म्हणून ग्रामसेवक ब्राह्मणे यांनी तक्रादार यांच्याकडे १० टक्क्याप्रमाणे २५,०००/- रुपये लाचेची मागणी केले बाबत आज रोजी तक्रारदाराने तक्रार दिली.


त्याप्रमाणे आज दि. २२ मार्च २०२५ रोजी लाचमागणी पडताळणी मध्ये ब्राह्मणे यांनी तक्रारदार यांना २ कामाचे २,७०,००० रुपयाचे बिल काढून दिले त्या कामाचे १० टक्के प्रमाणे २७,००० होतात परंतु तुम्ही जवळचे असल्याने २५,००० द्यावे लागतील, तुम्ही सरपंच ला देखील काही देत नाही असे सांगून २५,००० /- रुपयाची स्पष्ट मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व लाच रक्कम तात्काळ आणून देण्याबाबत तक्रारदार यांना सांगितले. त्यावरुन सापळा कारवाई करण्यात येवून नितीन भीमराव ब्राम्हणे वय ३७ वर्ष, ग्राम विकास अधिकारी, खर्दे बुद्रुक, ता धरणगाव, जिल्हा जळगांव. याना २५,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुध्द धरणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.यातील आरोपी  ब्राम्हणे यास आज रोजी मा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड दिली आहे.

या कारवाईत सापळा व पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, ला. प्र. वि. जळगांव. सापळा पथक ,श्रेणी पोउपणी सुरेश पाटील ( चालक ), पोना/ किशोर महाजॅन, पो. कॉ/अमोल सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!