भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमरावेर

चिनावल मध्ये १ लाख ६२ हजारांचा विमल गुटखा जप्त, सावदा पोलिसांची कारवाई

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील चिनावल येथे राज्यात बंदी असलेला १ लाख ६१ हजार १०५ रूपयांचा विमल गुटख्यासह तीन मोटर सायकली सावदा पोलिसांनी जप्त केल्या. या घटनेने गुटखा तस्कर व विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळच असलेल्या चिनावल शिवारात चिनावल – उटखेडा रस्त्यावरील सुकी नदी पुलावर राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी करीत असताना अजय शांताराम कोळी,रोझोदा. यश उर्फ योगेश पितांबर चौधरी, चिनावल. व अस्लम सलीम तडवी, लोहरा. सर्व राहणार  रावेर तालुका, यांना पकडुन त्यांची चौकशी केली असता त्याच्या कडून आरोग्यास अपायकारक असलेला सुगंधित केसर युक्त विमल पान मसाला गुटखा व तंबाखूजन्य गुटखा मिळुन आल्याने पोलिसांनी १ लाख ६१ हजार १०५ रुपयांच्या गुटख्यासाह तीन दुचाक्या जप्त केल्या.

या संदर्भात अजय शांताराम कोळी,वय ३७. रा. रोझोदा. ता.रावेर, यश उर्फ योगेश पितांबर चौधरी वय २७. रा. चिनावल. ता.रावेर, व अस्लम सलीम तडवी, वय २९.
रा. लोहरा. ता.रावेर, याना अटक करून त्यांच्यावर सावदा पोलिस स्टेशनला हे का. निलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई सपोनी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री सुरू आहे. सर्वत्र खुलेआम अवैध गुटखा विक्री व तस्करी सर्रास सुरू असून अन्न औषध प्रशासन मात्र या कडे दुर्लक्ष्य करीत असल्याची ओरड आहे. कित्येकदा कारवाया केल्या जातात. मात्र, त्यानंतरही त्यांची आवक व विक्री बंद होताना दिसत नाही. जिल्ह्यात शहरच नव्हे, तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रासपणे पानटपरी, दुकानांमध्ये होते. गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे. ती तोडण्यासाठी कठोर कारवायांची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!