रावेर गटविकास अधिकारी पदाचा विनोद मेढे यांनी स्वीकारला पदभार
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदी विनोद मेढे यांनी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच गट विकास अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांची नियुक्ती विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथून पदोन्नतीवर रावेर तालुक्यात करण्यात आली आहे.
या पूर्वी रावेर गट विकास अधिकारी पदाचा कार्यभार खेमचंद वानखेडे यांच्या कडे होता. आता पूर्णवेळ लाभलेले गट विकास अधिकारी विनोद मेढे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचा कारभार अधिक कार्यक्षम होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.