जळगाव

नियमांचे उल्लंघन केल्याने बियर बार वर कारवाई, विदेशी व बियर बाटल्या जप्त

सकाळी लवकरच उघडतात दारूची दुकाने

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l वेळे आधीच म्हणजेच सकाळी सात वाजताच परमीट रुम, बार उघडून मद्य विक्री करणाऱ्या नेहरु नगरातील साई परमिट रुम व बिअर बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी कारवाई केली. या कारवाईमध्ये सुमारे विदेशी व बियर बरच्या बाटल्या अशा ४२ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यात अनेक देशी,विदेशी, बियरबार, वाईन शॉप, रेस्टो बार शासनाचे नियम डावलून वेळे आधी उघडले जातात.

जळगाव शहरातील मोहाडी रस्त्यावरील नेहरु नगरातील साई परमिट रुम व बिअर बार सकाळी लवकर उघडला जातो. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विजय भूकन यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यांनी दुय्यम निरीक्षक चेतन शिंदे, पोकॉ प्रकाश तायडे, गोकूळ अहिरे, सत्यम माळी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकाने या परमिट रुमवर जाऊन पाहणी केली असता प्रत्यक्षात सकाळी ११:३० वाजता परमिट रुम सुरू करण्याची वेळ असताना सकाळी ६:५५ वाजताच ते उघडल्याचे आढळून आले.

शासनाने दिलेल्या वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने परमिट रुममधून विदेशी मद्याच्या १८० मिली च्या १४४ बाटल्या, ९० मिलीच्या १०० बाटल्या, बीअरच्या ४८ बाटल्या जप्त केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत सातत्य राहील का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून जिल्ह्यात अनेक बिअरबार, देशी विदेशी दारूची दुकाने, देशी दारूची दुकाने हे वेळेच्या आधीच उघडत आहेत. या साठी काही संबंधित खात्याचे अधिकारी/ कर्मचाऱ्यांची मुक संमती असल्याचे सांगितले जाते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!