भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

अवघी दुमदुमली पंढरी..! ‘विठू माउली तू माउली जगाची’  शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची पूजा

पंढरपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l “सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा; मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा.”

दरवर्षीप्रमाणे आजही पंढरपुरामध्ये राज्यभरातून लाखो वारकरी दाखल झालेत. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने दुमदुमून गेलंय. संपूर्ण पंढरपूर आज वारकरीमय झाल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासमवेत पंढरपुरात आज विठठ्ल-रूक्मिणीचं दर्शन घेतलंय. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. याप्रसंगी त्यांनी राज्यातील

मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान गेल्या सोळा वर्षांपासून नियमीतपणे पंढरीची वारी करणार्‍या सटाणा तालुक्यातल्या अंबासन येथीर रहिवासी बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या दाम्पत्याला मिळाला. पंढरपुरात आज विठू नामाचा गजर घुमत आहे.

लागोपाठ तिसर्‍यांना पंढरपुरात पुजा करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकर्‍यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असे साकडे आपण श्री विठ्ठलाला घातल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी दिली.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरपुरमध्ये दाखल झालेत. वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असल्याचं पाहायला मिळतंय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!