राज्यात पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पुणे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे, राज्यातील अनेक भागांना पावसाचा मोठा फटका बसला असून, काही ठिकाणी आर्थिक नुकसानही झाले आहे. सततच्या व मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे.असे असताना आज पुन्हा एकदा हवामान विभागाने (IMD) राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील चोवीस तासांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यताही वर्तविली आहे.
ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी ला अरेंज अलर्ट देण्यात आला आहे.काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबई व उपनगरात तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर पुण्यात व पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये ,पिंपरी चिंचवड परिसर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला,येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.