भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

नशिराबाद जवळ MIDC पाईप लाईनवरील व्हॉल्वमधून पाणी गळती ; रोज हजारो लिटर पाणी वाया

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद येथील छोट्या बोगद्याजवळ, पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या MIDC ला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवरील व्हॉल्वमधून सतत पाणी गळती होत असल्याचे दिसून येत आहे. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून याकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्यामुळे परिसरातील काही नागरिक त्या ठिकाणी येऊन पाणी भरून नेत असल्याचेही दिसून येते. मात्र नागरिकांनी पाणी भरल्यानंतरही उर्वरित पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने ही गळती थांबवण्यासाठी किंवा त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता असताना अशा प्रकारे हजारो लिटर पाणी दररोज वाया जाणे ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे MIDC प्रशासन व संबंधित विभागाने या ठिकाणची पाहणी करून व्हॉल्व दुरुस्त करणे किंवा गळती तातडीने बंद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

पाण्यासारख्या मौल्यवान संसाधनाची नासाडी टाळण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून तातडीने कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!