भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

“आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, आम्हाला डीचविण्याचा प्रयत्न करू नका”…जनार्दन हरिजी महाराज

पाल येथे सकल हिंदू समाजाची जन आक्रोश सभा

पाल, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी क्षेत्रात असलेले सुप्रसिद्ध पाल या गावात अध्यात्मिक गंगेचे भगीरथ परम पूज्य सद्गुरू संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजिंनी देशभरातील लाखो भाविकांची एकजूट करून भक्तांच्या हृदयात जी भक्तीची ज्योत पेटवून आचार विचार व व्यसन मुक्त,शुद्ध शाकाहारी जीवन जगण्याची कला अवगत करून दिली.

असे असताना त्यांच्या श्री वृंदावन धाम पाल आश्रमात असलेल्या श्री हरिधाम मंदिरासमोर च्या तलाव परिसर रस्त्यावर काही समाज विरोधी का कडून गैरकृत्य करतांना चे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करून कट रचण्याच्या प्रयत्न करणाऱ्यावर कार्यवाही व्हावी या करिता दि २१ सप्टेंबर रोजी पाल येथे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार,संत समाज व सकल हिंदू समाजातर्फे भव्य जनआक्रोष सभेचे महा मंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे अध्यक्षते खाली आयोजन करून प्रशासनास जागृत करण्यात आले.

या सभेत अखिल भारतीय संत समिती चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष फैजपूर येथील महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी जी महाराज,आचार्य श्री मानेकर बाबा,धुळे येथील श्री योगी दत्तनाथ महाराज,झिरण्या मध्यप्रदेश चे श्री राघवानंद भारती जी महाराज,जामनेर येथील श्री श्याम चैतन्य जी महाराज, जिन्सी साबरपाट चे श्री परमानंद जी महाराज, बुऱ्हाणपूर येथील श्री करण पुरी जी महाराज, फैजपूर येथील श्री पवन कुमार दास, सावदा येथील अनंत प्रकाश दासजी, कोठारी स्वयंप्रकाश दासजी, पाल येथील श्री दिव्य चैतन्य जी महाराज,शिव चैतन्य जी , ब्रज चैतन्य जी , नवनीत चैतन्य जी, राधे चैतन्य जी, सर्व चैतन्य जी, बललित चैतन्य जी, रामशरण चैतन्य, ऋषी चैतन्य जी, शुभ चैतन्य जी, महाराज आदी सह हजारो च्यां संख्येने चैतन्य साधक व सकल हिंदू समाज उपस्थित होते.

या सभेत महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रशासनाला सदर दोषींवर कार्यवाही करावी जेणेकरून असा प्रकार परत घडणार नाही जर तुम्ही या कार्यवाहित दिरंगाई करतांना दिसून आले तर आम्हाला पुढील मार्ग शोधावे लागतील. तसेच उपस्थितांना जागृत राहण्याचे आवाहन केले. तसेच आम्ही सर्व धर्माचा आदर करतो, तसा आमच्याही धर्माचा आदर करावा. अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत शांततेचा सल्ला दिला. या वेळी सर्व संत मंडळीत आक्रमकता: दिसून आली.

कोणत्याही धर्मा विषयी विटंबना केल्यास त्यांचे परिणाम भोगावे लागतील. व या घटनेच्या आरोपींवर व संशयी तावर कार्यवाही केली जाणार अशी ग्वाही अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी या वेळी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!