“जोपर्यंत पैसे भरत नाही तो पर्यंत मृतदेह देणार नाही” रुग्णालायाने ४० हजारांसाठी तब्बल ६ तास अडवला महिलेचा मृतदेह
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात १० लाखांसाठी गर्भवती महिलेवर उपचार नाकारल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४० हजार रुपयांसाठी सहा तास मृतदेह अडकवून ठेवल्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे घडला.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील कला रोडवरील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून कमला बाई इंगळे यांचे
ऑपरेशन होऊन त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या निधन झालेल्या महिलेच्या नातेवाईकांना ४० हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल ६ तास अडवून ठेवला
कमला बाई इंगळे यांच्या पायाला इजा झाली होती, त्यामुळे त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आले होते, दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या नंतर त्यांच्या नातेवाईकांना ४० हजार रुपयांचे बिल बाकी असल्याचं सांगत उर्वरीत रक्कमेची मागणी करण्यात आली. त्या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे “जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत मृतदेह देणार नाही ” असा पवित्रा घेत हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल ने महिलेचा मृतदेह तब्बल ६ तास अडवून ठेवला
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात अडकले असताना आता बुलढाण्यातील मलकापूर मधील हकिमी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रशासनावर यासंदर्भात गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून महाराष्ट्रात अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून शासनाने यावर ठोस पावले उचलण्याची मागणी पुढे येत आहे.