मुख्यमंत्रीही ठरला?मविआच चं ठरलं ? १००-१००-८०, कोण होणार मुख्यमंत्री? मुख्यमंत्रीही ठरला?
मुबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l विधानसभा निवडणुकी साठी माहाविकास आघाडीचं जागा वाटप ठरल्याची माहिती समोर आली आहे. १०० -१००-८० जागांचा फॉर्म्युला ठरला असून जो जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
कसा ठरलाय माहाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला…
कांग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी १०० -१०० जागा लढविणार, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विधानसभा निवडणुकीच्या ८० जागा लढविणार तर दुसऱ्या घटक पक्षांना ८ ते १२ जागा देणार, ज्यांच्या जास्त जागा निवडून येणार त्यांचा मुख्यमंत्र, असा फॉर्म्युला महाविकास आघाडीत वाद टाळण्यासाठी शरद पवार यांनी हा फॉर्म्युला दिला असल्याचं सांगितलं गेलं.
२०१९ मध्ये भाजप व शिवसेना यांनी युती करून एकत्र विधानसभा निवडणुक लढविली होती मात्र मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांचं बिनसलं आणि युती तुटली हा इतिहास लक्षात घेता महा विकास आघाडीने जागा वाटप आणि मुख्मंत्रीपदावरून वाद निर्माण होऊ नये या साठी आता ताक ही फुंकून प्यायच ठरविल्याच दिसतंय.