भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिकराजकीय

“जहाँ नाही चैना, वहा नाही रहाना” असे सूचक वक्तव्य करत “वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा,”अजित पवारांवर छगन भुजबळांचा हल्लाबोल

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मंत्री पद ना मिळाल्याने राष्ट्रवादीची मुळुखमैदान तोफ छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकमध्ये दाखल झाले. त्यातच त्यांनी “जहाँ नाही चैना, वहा नाही रहाना” असे सूचक वक्तव्य केले. त्या नंतर येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत छगन भुजबळ यांनी या वेळी “वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा,” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असे सांगितले. मकरंद पाटील यास मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड काय देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केलाय.

भुजबळ  पुढे म्हणाले की, हा लढा मंत्रीपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे, लढा अपमानाचा आहे. मी पुन्हा उभा राहील, लोकशाही आहे. पटेल, तटकरे यांचे कॉल पण ते ऐकत नसल्याचे सांगितले. मी कुठेच जाणार नाही, इथेच राहणार आहे. उद्या समता परिषद मेळावा आहे. मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. कोणीही खचून जावू नका, निराश होवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!