आंतराष्ट्रीयसामाजिक

सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, कोणत्या देशाने केले फर्मान

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. लवकरच या संदर्भात कठोर कायदा लागू होणार असल्याचे फर्मान काढण्यात आले असून हे फर्मान ऑस्ट्रेलिया सरकारने केले आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारने असे फर्मान केले आहे की, ऑस्ट्रेलिया मध्ये १६ वर्षा खालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. सोळा वर्षा खालील मुलांना सोशल मीडियावर कोणतही अकाउंट ओपन करता येणार नाही. सोशल मीडियाच्या वापरामुळे मुलांचे भवितव्य घोक्यात येत असल्याचं ऑस्ट्रेलियन सरकारनं म्हटल आहे. तसेच सोशल मीडियान लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच वेठीस धरलं आहे. या संदर्भात कठोर कायदाही केला जाणार असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!