सभा सुरू असताना भरसभेत पोलिसांनी ओवैसींना स्टेजवरच…..
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिली. विशेष म्हणजे ओवैसींची सभा सुरू असतानाच स्टेजवर चढून पोलिसांनी त्यांना ही नोटीस दिली. यामुळे हा प्रसंग चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, प्रचारावेळी प्रक्षोभक भाषण टाळावीत, नियमांचे पालन करावे अशा नोटीस उमेदवारांना त्यांच्या कार्यालयात किंवा घरी पाठवल्या जातात. मात्र ओवैसींना ही नोटीस स्टेजवर दिली गेली.
खासदार ओवैसी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार फारूख शाब्दी यांच्या प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना पोलिसांनी स्टेजवर चढून त्यांना नोटीस दिली. भाषणामुळे कोणत्याही समाजाच्या भाषणा दुखावतील अशी भाषा वापरू नये, अशा आशयाची ही नोटी होती. यावर ओवैसींनी नोटीस मराठीत असल्याने फोटो काढला आणि त्याची इंग्रजीमधील प्रत मागवली.