भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मंत्रीपदाची कोणाला संधी? महाराष्ट्रातून “यांची” नावे चर्चेत? खान्देशातून कोण होणार मंत्री?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l उद्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून संध्याकाळी ७.१५ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोदींसोबत एकूण १८ मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही महत्त्वाची मंत्रीपदे दिली जाणार असून त्यात महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत.

खान्देशातून देशातून रक्षा खडसेंना संधी?
खान्देशातून रक्षा खडसे यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्रीपदासाठी भाजपकडून चार खासदारांची नावे चर्चेत आहेत. त्यात नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. खान्देशातून खडसे मंत्री होतात का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाला दोन मंत्रीपदे दिली जाणार आहेत. एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. शिंदे गटातील ते सर्वात सीनिअर खासदार असल्याने त्यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. शिंदे गटाच्या खासदारांचीही तशी मागणी आहे.

पण आदित्य ठाकरेंबाबत उद्धव ठकारेंवर जी टीका झाली, तीच टीका आपल्यावरही होऊ शकते याची भीती असल्याने एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर श्रीकांत शिंदे यांनीही पक्षातील सीनिअर खासदाराला मंत्रीपद द्या, अशी मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर अजितदादा गटालाही एक मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव चर्चेत आहे. एक मंत्रीपद आणि दोन नेते अशी चुरस अजितदादा गटात आहे. त्यामुळे अजितदादा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तर पटेल मंत्री होतील, तर राज्यमंत्रीपद मिळालं तर तटकरे मंत्री होतील, असंही सांगितलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!