भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार? यादी आली समोर

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l  भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यामुळे सकाळी ८.३० ते १० या दरम्यान अन्य कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित केला जाऊ नये असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. मुंबईतील मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल,

विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री तसेच राज्यमंत्री खाली दर्शविलेल्या प्रमाणे ध्वजारोहण करतील.

ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे

पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार

नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील

बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे

रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे

वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ

सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील

नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन

पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक

जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील

यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड

मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा

मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार

रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत

धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल

जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे

नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे

चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके

सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई

लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले

नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे

सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे

हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ

भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे

छत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट

धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)

सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे

अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर

गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील

कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर

गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल

वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर

परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे – बोर्डीकर

अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक

ध्वजारोहण ठिकाणी ध्वजारोहण करणारे मंत्री, राज्यमंत्री अनुपस्थित असल्यास विभागीय मुख्यालयातील आयुक्त, जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. प्रांत अधिकारी जिल्हा उपविभागीय तर तहसीलदार तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी अध्यक्षपद स्विकारतील. प्रजासत्ताक दिनी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारती, किल्ले, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत असेही राजशिष्टाचार विभागाने कळवले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!