रावेर लोकसभा मतदारसंघ कोणाचा? शिवसेनेच्या आ. पाटलांकडून थेट दावा, तर भाजप म्हणत…, आमचा पारंपरिक मतदारसंघ, युतीत वाद रंगणार ?
Monday To Monday News Network |
मुक्ताईनगर, प्रतिनिधि अक्षय काठोके | राज्यात लोकसभेच्या जागावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला रावेर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येणार का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यांचे कारणही तसेच आहे शिंदे गटाकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अपक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी रावेर लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजपचा हा पारंपारिक मतदासंघ असल्याचे सांगत भाजपचे प्रदेश समिति सदस्य अशोक कांडेलकर यांनी आ. पाटील यांच्या दाव्याला आव्हानं दिले आहे. यामुळें मतदासंघाच्या रस्सीखेच मध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येणार तसतशा घडामोडी वाढत जाणार. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून युतीचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र काही जागांवरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यातच आता भाजपचे प्राबल्य असलेला गेल्या २० ते २५ वर्षापासून भाजपचा विजयश्री देणाऱ्या रावेर लोकसभेच्या जागेवरुन युतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. रावेर लोकसभेच्या जागेवर आता सेनेचे जिल्हाप्रमुख तथा अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही जागा शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी करत मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याचे सांगत रावेर लोकसभेवर शिवसेनेने दावा केलाय. पण असं असलं तरी भाजपकडूनही मोर्चेबांधणी सुरु झालीय. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी संघटनात्मक बैठका सुरु केल्या आहेत.
आ. पाटील यांच्या दाव्यानंतर यासंदर्भात “मंडे टू मंडे न्युज” ने भाजपच्या प्रदेश समिति निमंत्रित सदस्य अशोक कांडेलकर यांच्याशी संपर्क साधुन प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आमदार लोकप्रतिनिधी आहे. मात्र, रावेर लोकसभा हा भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक मतदासंघ असल्याचे सांगत त्यांनी कार्यक्रमात असल्याचे सांगून जास्त बोलणें टाळले खरे पण पारंपरिक मतदारसंघ असल्याचे सांगत आ. पाटील यांच्या दाव्याला खोडून काढले. हाडांने संघ व भाजपायी असलेले कांडेलकर व मतदासंघातील भाजप पदाधिकारी पक्षांचे प्राबल्य असलेला मतदासंघ शिवसेनेसाठी सोडण्यास तयार होतील तर नवलच… ! यामुळे आ. चंद्रकांत पाटील आपली मागणी कुठवर लाऊन ठेवतात हे महत्त्वाचे असेल.
गेल्या २० ते २५ वर्षापासून या मतदासंघावर भाजपचे उमेदवार निवडून येत आहे. मात्र, आता परिस्थिती वेगळी असून पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते तथा माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी हातावर घड्याळ बांधले आहे. भाजपचा हा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो तसे भाजपचे पदाधिकारीही सांगत आहे मतदासंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचा दांडगा जनसंपर्क असून गेल्या दोन पंचवार्षिक निवडूण आल्याने खासदार खडसेंचे मतदासंघावर मजबुत पकड पाहायला मिळते. मतदासंघात भाजपचे प्राबल्य असताना आता हा मतदारसंघ भाजप शिवसेनेला सोडणार का ? यानिमित्ताने शिवसेना भाजप युतीमध्ये या अनुषंगाने वाद निर्माण होऊन मिठाचा खडा तर पडणार नाही ना ? अशी चर्चा यांमुळे सुरू झाली आहे.