भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

जळगावच्या ५० हजार ७३२ शेतकऱ्यांची मदत सरकारने का रोखली? विधानपरिषदेत एकनाथ खडसेंचा सरकारला सवाल

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात सरकारला चांगलेच धारेवर धरले. “जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होऊनही ५० हजार ७३२ शेतकरी ई-केवायसी अभावी मदतीपासून वंचित का?” असा जळजळीत सवाल खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद सभागृहात उपस्थित केला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासकीय दिरंगाईचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


आमदार खडसे यांनी सभागृहच्या निदर्शनास आणून दिले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
माहे सप्टेंबर, २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आपत्ती प्रतिसाद निधीसाठी माहे डिसेंबर, २०२५ च्या पुरवण्या मागण्यांमध्ये १५ हजार ६४८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे,शासनाकडून मदतीची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र मदत पोहोचलेली नाही. जळगाव जिल्ह्यात ५० हजार ७३२ हून अधिक शेतकऱ्यांची मदत ‘ई-केवायसी’ आणि इतर तांत्रिक त्रुटींच्या नावाखाली प्रलंबित ठेवलेली आहे. शेतकऱ्यांची मंजुर असलेली मदत अडकवून ठेवणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. “पंचनामे झाले, नुकसान सिद्ध झाले, मग तांत्रिक बाबींचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची अडवणूक का केली जात आहे?” असा सवाल एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला.


केवळ जळगावच नव्हे, तर राज्यातील सोलापूर आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातही अशाच तांत्रिक कारणांमुळे नुकसानभरपाईची रक्कम जमा झालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शासनाने यावर तातडीने चौकशी करून सतांत्रिक अडचणी दूर कराव्या व सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १००% भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना दर्जेदार (सकस) बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली
एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही वस्तुस्थिती अंशतः मान्य केली. जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ई-केवायसी प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी तालुकास्तरावर विशेष कॅम्पचे (शिबिरांचे) आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेद्वारे प्रलंबित तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नुकसानभरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही केली जाईल असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले

जळगावच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकनाथराव खडसे यांनी दाखवलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासनाला वेगाने हलवावे लागणार आहे. “शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत हा पाठपुरावा थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यामुळे अनेक दिवसांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!