दारूदुकाने उघडता तर मंदिरे का नाही ?; फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल !
मुंबई । राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील जनता जागृत आहे. मंदिरे उघडल्यानंतर तिथे गर्दी होणार नाही. देशापेक्षा महाराष्ट्र राज्य वेगळं नाही, हे सगळ्याच धर्मीयांचं म्हणणं आहे. जनतेची भावना लक्षात घेऊन सरकारने तत्काळ मंदिरे उघडी करावीत.