भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावलरावेर

“प्रजासत्ताक दिन” ‘ड्राय डे’ असताना सावदा – फैजपूर परिसारात ढाब्यांवर दारूची सर्रास विक्री, दारूचा महापूर

सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज “२६ जानेवारी” “प्रजासत्ताक दिन” “ड्राय डे ” असल्याने राज्यभरात सर्व देशी – विदेशी दारू दुकाने, बियर बार सह इतर दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. ‘ड्राय डे ‘ असल्याने कुठेही अवैध दारू विक्री केली जाऊ नये असे शासनाचे आदेश असताना सुद्धा सावदा – फैजपूर परिसरात असलेल्या ढाब्यांवर देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री केली जात आहे . सावदा – रावेर मार्गावर व फैजपूर – भुसावळ मार्गावर, फैजपूर – यावल मार्गावर हॉटेल ढाब्याची वाढ झाली आहे. अनेक ढाब्यांवर देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे . रावेर – यावल तालुक्यातील जवळ पास सर्व ढाब्यांवर दारूची विक्री बेकायदेशीर होत आहे .

संबंधित उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे अधिकारी कपाटे साहेब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता “ते” फोन रिसिव्ह करीत नाही, तर उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव जिल्हा अधीक्षक डॉ विठ्ठल भुकन साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई करायला सांगतो. असे सांगितले मात्र प्रत्यक्षात आता पर्यंत कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही. वरपर्यंत सर्वांना रसद पुरविली जात असल्याचे एका विक्रेत्यानेच सांगितले. तक्रारी झाल्या तरच एखादी छोटी मोठी कारवाई दाखविली जाते. व ती कारवाई केल्याचा मोठा वाजा – गाजा करून प्रसिद्धी दिली जाते.

“२६ जानेवारी ‘प्रजासत्ताक दिन’ रोजी दारूचा महापूर”
तसेच फैजपूर – भुसावळ रस्त्यावरील पिंपरुड – आमोदा – बामणोद – पडळसे ते भुसावळ रस्ता , आणि फैजपूर – साखर कारखाना – हंबर्डी – हींगोणा ते यावल अशा परिसरातील ढाब्यांवर व इतर ठिकाणी देशी विदेशी अवैध दारू मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

ढाब्यांवर ट्रक चालकांना जादा दराने देशी विदेशी दारूची विक्री केली जाते .अवैध दारू विक्री व्यवसाय थांबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक उपनिरिक्षक व कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या साठी स्वतंत्र कार्यालय आहे .अवैध दारू विक्री व्यवसाय थांबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

वॉश आऊटची मागणी –
सावदा ते रावेर मार्गावर , सावदा – फैजपूर – यावल मार्गावर व फैजपूर – भुसावळ मार्गावरील ढाब्यांवर व इतरत्र सुरू असलेले अवैध धंदे वॉश आऊट मोहीम राबविण्याची आर्त हाक देत महामार्गावरील दाबे हॉटेलवर होणारी अवैध बिनधास्त राजरोसपणे खुले आम विक्री केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!