भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

पती सोबत जात असताना दुचाकी थांबवायला लाऊन पत्नीने घेतली विहिरीत उडी

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील महेलखेडी येथील माहेर असलेली विवाहिता पतीसोबत दुचाकीद्वारे जात असताना विरावली गावाजवळ विवाहितेने अचानक दुचाकी रस्त्यातच एका शेताजवळ थांबवायला लाऊन तेथील शेतातील विहिरीत धावत जाऊन उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच पतीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक गोळा झाले त्यांनी लागलीच विवाहितेला विहिरीतून काढून यावल रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले.

अल्ताफ रहेमान तडवी हे त्यांची पत्नी मुस्कान अल्ताफ तडवी (वय २०) ही दोघे दुचाकीवरून जात असताना अचानक पत्नी मुस्कानने पती अल्ताफ तडवी यांना विरावली गावाजवळ शेत गट क्रमांक ५७ येथे दुचाकी थांबवण्याचे सांगितले. मुस्कानने दुचाकीवरून उतरून पतीच्या डोळ्या देखत थेट शेतातील विहिरीत उडी घेतली. हा प्रकार पाहून तिच्या पतीने आरडाओरड केली. नागरिकांनी तेथे धाव घेऊन विवाहितेला विहिरीतून बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून विवाहितेला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, विवाहितेला तिच्या पतीनेच विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. पुढील तपास डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!